सळुक्यांची पंढरी – किल्ले माहुली

वानरटोक, रंगभतू , चीरा, छोटा माहुली लिंगी, कणगा, नवरीची करवली, नवरी, भटोबा, नवऱ्याची करवली, भांडार, माहुली बाण, चांदेश्वेर, हॉट डॉग, कृष्णा, हार्ड बोल्डर, लसू बोल्डर, माहुली गणेश, नवरा, नवरा लिंगी, वाजंत्री, वाजंत्री लिंगी, वज्र, विष्णू, ब्रम्ह, नंदी, शंकर, पार्वती, पॉन, वजीर.

Mahuli Fort View From Top – Winter Season v/s Rainy Season

वरील नावे वाचनू तुम्ही आश्चर्यचर्यकित झालात का? व्हायला पण पाहिजे मित्रांनो. तब्बल ३० हुन अधिक सळुके असलेला किल्ले माहुली आपल्यापासनू अगदी हकेच्या अतंरावर असनू आजही इतिहासाची साक्ष देत कणखरपणे उभा आहे. तरीही बऱ्याच जणांना ह्याची साधी कल्पनाही नाही ह्याचीच खतं ….

माहुली किल्ल्यावर जसे ३० हुन अधिक सळुके आहेत तसेच किल्ल्यावर पोहचण्यासाठी ३ वाटा देखील आहेत. शिडीची वाट, कल्याण दरवाज्याची वाट आणि महादरवाज्याची उध्वस्त वाट. शिडीची वाट ही माहुली गावातनू वर जाते आणि किल्ला सर करण्यासाठी सर्वात सोपी वाट आहे.

Way To Mahuli Fort

दिनांक १७ जनू २०१८ रोजी मी किल्ले माहुलीला भेट दिली आणि या आधीही मी ३ वेळा माहुली सर केला आहे. माहुली हा किल्ला शहापूर तालुक्यात आसनगांवस्थित एक प्रसिध्द निजामकालीन किल्ला आहे. किल्ले माहुली एकेकाळी नजामशाही राजधानी म्हणनू ओळखली जात असे. किल्ल्याचा विस्तार एवढा अफाट की किल्याचा गडमाथा सपंर्णू पाहायचा असेल तर २ दिवस लागतात. इतिहास बघता शिवाजी महाराज्यांचा जन्म याच किल्ल्यावर होणार होता. पण किल्ल्यावर हल्ला होणार हे समजताच जिजाऊंना माहुलीहुन रातोरात किल्ले शिवनेरीवर जावं लागले आणि शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. माहुली हा स्वराज्यात असा एकमेव किल्ला आहे जेथे शहाजी महाराज, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे पाय लागले आहेत. किल्ल्यावरून भातसा राशी, अलगं, मदन, कुलगं व कळसुबाई पर्वतरांग दिसते तर पूर्वेला हरिशचंद्र गड, आजोबा, दक्षिणपूर्वेला माथेरान रांग, दक्षिणपश्चिमेला तानसा खोरे, तुंगेश्वर रांग असलेला प्रचडं मलुखू दिसतो. १३ जनू ला जेव्हा विख्यात असा परुंदरचा तह झाला तेव्हा २३ किल्ल्यांमध्ये माहुलीचाही समावेश होता आणि त्याच वेळी स्वराज्यातील २ किल्ले वाचवण्यासाठी माहुली किल्ल्याची ३ भागात विभागणी करण्यात आली. किल्ले माहुली, भंडारदुर्ग आणि पळसगड अशी विभागणी झाली.

माहुली किल्ल्याला भेट द्यायची म्हटलं की हा आमच्या आवडीचा आणि माहुलीच्या आठवणींत मोहून टाकणारा विषय. ज्या दिवशी भेट द्यायची असते त्या आधल्या रात्री झोप येणं अशक्यच. ह्याचे कारण म्हणजे माहुली किल्ल्याचे पर्णू चित्र डोळ्यापढुे उभे राहाणं होय. नेहमी प्रमाणे सकाळी ७ वाजता आम्ही आसनगांव रेल्वेस्थानकाहून शहापूर बसस्थानकावर रिक्षेने गेलो. पढुे ८ वाजेची माहुली गावात जाणारी बस पकडून आम्ही किल्ल्याचा पायथा गाठला. पुढे वनविभागाची परवानगी घेऊन आम्ही किल्ल्याकडे आगेकूच केली. पावसाचे दिवस असल्यामुळे गडमाथा पूर्ण धुक्यात दाटून बसला होता.

थोडेसे डोके वर काढून बघणार नवरा, भटोबा आणि करंगळी हे तीनच सळुके नजरेस पडत होत. ९ वाजता आम्ही ट्रेकला सरुुवात केली आणि अवघ्या २:३० तासांत आम्ही किल्ल्याचा गडमाथा गाठला. पढुे माहुलेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही गडावर निवांत पावसाचा आनदं घेत वेळ घालवला. १२:३० वाजेच्या सुमारास आम्ही खाली उतरायला सरुुवात केली आणि १:३० वाजता माहुली गावातनू शहापूर कडे जाणारी बस पडकली. ४ वाजेपर्यंतआम्ही घरी परतलो. अनभुव फारच अविस्मरणीय होता. किल्ले माहुलीला पावसाळ्यात भेट देण्याची मज्जा काही औरच आहे.

माहुलीच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन करताना खालील ओळी लिहिल्या गेल्या होत्या आणि तचे इथे भेट दिल्यावर अनभुवायला देखील मिळतं.
“इथ उडत्या पक्ष्याच्या पंखावरही शेवाळे उगवत,
कोंबड्या जिवतंपणीच कुजतात,
सर्पांना दौंश करताना आपल्या वीशात पावसाचे पाणी मिसळले जाण्याचे भय असते,
आणि झाडात झपे घेणाऱ्या वाघाला झडुपच कवटाळून घेतात”

माहुली गावातनू माहुलीचा करंगळी सळुका दिसला आणि माझ्या काळजाचा ठोकाच चकुला. मित्रांनो हा सखुद क्षण अनभुवायचा असेल तर माहुलीला नक्की भेट द्या. आज किल्ल्याला भेट देण्यास कारण की १६ जनू १६७० म्हणजेच कालच्या दिवशी माहुली किल्ल्याची किल्लेदारी मनोहरदास गौडा त्यांनी सोडली आणि नविन किल्लेदार आला अलिवर्दि बेग. त्याचवेळी मोरोपतं पिगंळेयांनी माहुली – भंडारदुर्ग पळसगड ही दुर्गत्रयी जिंकली.

Main Door At Top Of The Fort

Check more photos here.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started
search previous next tag category expand menu location phone mail time cart zoom edit close